गुजरात विधानसभेमध्ये विजया निमित्त श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नेतृत्वात पेढे वाटून, फटाके फोडून, नरसीत जल्लोष करण्यात आला.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
गुजरात मध्ये अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सकाळी 10 वाजल्यापासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची श्रावण पाटील भिलवंडे यांच्य संपर्क कार्यालयात गर्दी होऊ लागली.दूरचित्रवाणी वर जसजसे निकाल जाहीर होऊ लागले तसे तसे घोषणांचा जोर वाढू लागला.विक्रमी आघाडी घेतल्याचे निश्चित झाल्यानंतर सर्वजण नरसी चौकात जमा झाले.
देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, गुजरात तो एक झाकी है मुंबई मनपा बाकी है यासारख्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. भाजपाचे झेंडे हातात घेतलेले तरुणांनी आनंद व्यक्त केला.यावेळी भाजपा नायगांव शहराध्यक्ष शंकर पा कल्याण, मोहन पा भिलवंडे,मारोती पा भिलवंडे, व्यंकट कोकणे, गजानन भिलवंडे, साईनाथ आक्कमवाड, अलिम पटेल, सय्यद ईस्समाईल, राजु वडगांवे, दिगांबर भिलवंडे, विनोद भिलवंडे, राम खनपट्टे , सचिन नरसीकर, किशन खनपट्टे, सय्यद मुन्नीर, सय्यद खलील, शेख मुबारक, बालाजी नरसीकर, त्र्यंबक डाके, शंकर गागलेगावे, दत्ताराम पा शेळगांवकर, विनायक पा शेळगांवकर, इत्यादी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या