बाल कॅबिनेटच्या सहयोगाने दिशा प्रकल्पामध्ये जागतिक महिला दिवसानिमित्त गुलाबी संध्या उपक्रम संपन्न !

(रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे)
दिनांक 08 मार्च 2021 : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन आणि HDFC परिवर्तन च्या सहकार्याने दिशा प्रकल्पामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गुलाबी संध्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिशा प्रकल्प महाराष्ट्रातील 08 जिल्ह्यात मुलांचे सर्वांगीण विकास तथा समुदाय विकासासाठी कार्य करत आहे. बालकाला केंद्रस्थानी ठेऊन दिशा प्रकल्पाचे माध्यमातून बालकाचे विकासा संबंधी समुदायात जनजागृती व्हावी व बालकाचे विकासात समुदायाचा सह्भाग वाढावा म्हणून अनेक शैक्षणिक तथा सहशैक्षणिक उपक्रम घेतली जातात.

गुलाबी संध्या या कार्यक्रमाचे आयोजन रायगड जिल्ह्यातील जावळी , आणि भाले येथे करण्यात आले. कोरोनाचा कालावधी लक्षात घेता शासनाने घालून दिलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 02 गावातील 208 किशोरवयीन मुले मुली व त्यांचे कुटुंबीय आणि गावातील सरपंच, SMC सदस्य, PRI सदस्य यांनी सहभाग नोंदवला. गुलाबी संध्या कायक्रमामध्ये सहभागिनीं त्यांच्या घरी गुलाबी रंगाची मुलींना/महिलांना समान हक्क, संधी दर्शविणारी एक विशिष्ट रांगोळी काढली, सोबतच ‘मुलगी शिकली, प्रगती झाली.’ हे घोषवाक्य लिहिले व रांगोळीशेजारी दीप प्रज्वलित केला.
गुलाबी संध्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांचे/मुलींचे शिक्षण आणि त्यांचे हक्क आणि त्याबाबत समुदायाचे संवेदनशीलता निर्माण करणे आणि या संदर्भात जनजागृती अभियान राबविणे. संपूर्ण गावात संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने किशोरवयीन मुले, पालक आणि समाजातील सर्व भाग धारकांना सहभागी करून घेणे, हा होता.
या आयोजनाच्या निमित्ताने किशोरवयीन मुले मुली व त्यांचे कुटुंबीयांमध्ये महिलांचे शिक्षण,अधिकार आणि लिंग समानता या बाबींबद्दल जागरूकता यावी याबद्दल प्रयत्न करण्यात आले. यानिमित्ताने सर्व सरपंचांनी व गावातील लोकांनी बाल कॅबिनेट आणि दिशा प्रकल्पाच्या या उपक्रमाचे कौतुक करून आयोजना बद्दल आभार मानले.
मा.निकी जयश्री परमानंद यांच्या मार्गदर्शनामध्ये गुलाबी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रायगड जिल्ह्याचे प्रकल्प समन्वयक श्री. विनोद शंबरकर , साधन व्यक्ती संभाजी शिंदे बाल कॅबिनेट आणि दिशा युथ क्लब चे युवकानी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या