गुरुजी फाउंडेशन तर्फे सालेगाव येथे दुसरा बंधारा बांधकामास सुरुवात !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
गुरुजी फाउंडेशन कुसुम नगर वागलवाडा ता.उमरी जि.नांदेड या संस्थेचे मुख्य प्रेरणास्त्रोत तसेच व्हीपीके ग्रुपचे संस्थापक चेअरमन माननीय श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या हस्ते बंधारा भूमिपूजन करण्यात आले यावेळी गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष मा.श्री.संदीप मारोतराव पाटील कवळे उपस्थित होते.
गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून धर्माबाद व उमरी थोडक्यात चार ते पाच बंधारे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट माननीय मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी व्यक्त केले बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांच्या बोर विहिरीला पाण्याचे स्त्रोत वाढेल व उन्हाळ्यात गुराढोरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, बागायती शेतकऱ्यांना बंधाऱ्यामुळे पाणी साठविले जाईल त्याचा वापर ऊस हरभरा इत्यादी पिकांना मिळेल या भागचा उद्देश असून परिसरातील पाणी स्त्रोत वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी उपयुक्त ठरेल, सदरील कार्यक्रमास सालेगाव व निमटेक गावातील बालाजी पा.(चेअरमन)देवराव पा.(पोलीस पाटील)श्रीनिवास पा.(उपसंरपच)पा.(सदस्य)पाटील (तंटामुक्ती अध्यक्ष), सुभाष गोरडकर,धोंडजी पाटील,सूर्यकांत पाटील,उत्तम पाटील,व्यंकटराव पाटिल,रावसाहेब पाटील भुतावळे,नागनाथ पाटील,पंडित पा,शिवशंकर पाटील ,शेतकरी व व्यापारी उपस्थित होते श्री सरपंच इत्यादी प्रतिष्ठित नागरिक व मधुकर पाटील शिंदे बोळसेसकर (उपाध्यक्ष गुरुजी फाउंडेशन),पडोळे साहेब (सी.डी.ओ),प्रशांत कदम लक्ष्मण पाटील हरेगावकर ,सुनिल जोगदंड (सचिव), गुरुजी फाउंडेशनचे समन्वयक श्री बाबुराव भोसले सदस्य श्री यु.जी.कदम कार्यवाह गुरुजी फाउंडेशन कारखान्याचे सिव्हिल इंजिनिअर श्री पवितवार गुत्तेदार सटवा पवार व असंख्य शेतकरी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या