गुटका व मटका किंग पोलिसाच्या जाळ्यात !!

[ नायगांव तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगांव पोलीसांच्या गुप्त माहीतीवरून नायगांव शहरातील नाना नानी पार्क शेजारी एक जन मटका घेताना तर एकाच्या घरात विक्रीच्या उदेशाने गुटखा आसल्याची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी घरावर धाड मारत ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे. नायगांव पोलीस अ‍ॅक्शन मुडवर आसुन या कारवाई ने अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहे. हे वृत्त लिहीपर्यंत नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु होती.
नायगांव पोलीसाची सदया अवैध धंदेवाल्यावर कारवाई करण्याचा धुमधडका चालु आसुन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे अ‍ॅक्शन मुडवर आले आसुन मागील काही दिवसांपासून गुटखा मटका, अवैध धंदेवाल्याचे कंबरड मोडण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. नायगांव शहरातील नाना नानी पार्क जुना मोडा येथे मोईन जबार सिद्धिकी मटका घेत आसल्याची माहीती मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे व त्यांची टीमने मटका घेणा-यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळील साहीत्य ताब्यात घेऊन ७३१० चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच ठीखाणी आब्दुल शेमी जमिल साब याच्या घरात अवैध गुटखा विक्रीच्या उदेश ने आसल्याच्या माहीतीवरून घराची झडती घेतली आसता वेगवेगळ्या कंपनीचा अवैध गुटखा आढळून आल्याने ४६८०० रूपायचा मुदेमाल जप्त करून एकास ताब्यात घेतले आहे.
दोन वेगवेगळ्या गुन्हयातील मोईन जबार सिद्धीकी मटका घेताना तर आब्दुल शेमी जमिल यांच्या घरात अवैध गुटखा आढळल्या प्रकरणी आटक केली आहे. हे वृत्त लिहीपर्यंत नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु होती . ह्या कारवाईत पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, पोहेका विलास भोळे, देवकते ज्ञानोबा, मिरा मेडके, चालक विलास भोळे, बाबु चरकुलवार आदीनी ही कारवाई यशस्वी केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या