कुंडलवाडीत हज यात्रेकरूंचा गौरव  !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
              येथील मुस्लिम समाज बांधव ईस्लाम धर्मातील पवित्र अशा मक्का,मदीना स्थळी हज यात्रा करून सुखरूप परत आल्याबद्दल व मुन्वर मस्जिद येथे 53 वर्ष मौलवी म्हणून सेवा बजावले जेष्ठ नागरीक हाजी मोहम्मद नवाब मोहम्मद रहीमसाब यांचा सेवानिवृत्ती निमित्य सत्काराचा कार्यक्रम के रामलू मंगल कार्यालय येथे दिनांक 2 ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष डॉ एस एस शेंगुलवार यांनी आयोजित केला होता.

सदरील कार्यक्रमात मौलवी हाजी.मोहम्मद नवाब मोलिसाहाब, हाजी.ईब्राहीम सेठ, हाजी.बरान खान साहाब,हाजी.एम.ए.जलील मोलीसाहाब,खाजी.अहेमदहुसेन साहाब,हाजी.जावेद नांदेडकर आदींचा सामाजिक बांधिलकी जोपासत महेरूमा,ताज,पुष्पहार देवून यथोचित सन्मान करून गौरविण्यात आले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष एस.एस.शेंगुलवार, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेंद्र जिठ्ठावार,माजी.नगरसेवक सचिन कोटलावार,साई भोरे,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गंगाधर पोरडवार, अनिल वडगावे, सय्यद ईस्तेहाख अल्ली, शेख मिरा,छोटू भाई,प्रा.यासीनखान पठाण, माजीद नांदेडकर, सिद्धार्थ कांबळे, वसंत मदिकुंटावार, जलालखान पठाण, पाशा भाई पोस्ट मॅन, पाशा भाई पानशाॅप, पठाण रियाज, शेख युसूफ खाजामियाॅ, अहेमदहुसेन बागवान, बाबू भाई, शेख जब्बार आदीसह मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहम्मद अफजल तर आभार डाॅ.एस.एस.शेंगुलवार यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या