नरसी येथील हाजी सय्यद हुसेनसाब मुल्ला यांच निधन !

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
  नरसी येथील सेवा सहकारी सोसायटीचे संचालक हाजी सय्यद हुसेनसाब मुल्ला वय ८५ वर्ष यांचे दि.४ जुलै रोज बुधवार रोजी सुमारे रात्री ९.00 वाजता -हद्द्यविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे.
हाजी सय्यद हुसेनसाब मुल्ला यांची दफनविधी दि.५ जुलै रोज बुधवार ठीक 2 वाजता हज़रत सय्यद खाकीशाह वली रहे. दर्गा कब्रस्तान नरसी (जुने गाव) तालुका नायगाव येथे, दफन करण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण, भाजप चे श्रावण पाटील भिलवंडे, संभाजी पाटील भिलवंडे, राजु गंदीगुडे, रवींद्र भिलवंडे, डॉक्टर संतोष मोरे, डॉक्टर शिवाजीराव कागडे,एडवोकेट इंगोले,API संकेत दिघे , सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे, जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर,प्रभाकर लखपत्रेवार, मनोहर तेलंग, गजानन चौधरी, लक्ष्मण बर्गे,गंगाधर गंगासागरे, पत्रकार सय्यद मतीन मुदखेड़कर, पोलीस पटेल इब्राहिम बेग, मारोती पाटील भिलवंडे, गजु पाटील भिलवंडे व गावातील सर्व माजी सरपंच, सर्व माजी चेअरमन ग्रामपंचायत सदस्य व नरसी येथील सर्व हिन्दू मुस्लिम, मागास्वर्गीय समाजातील गवकरी व पाहुने मंडळी यांचा हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. हाजी सय्यद हुसेन साब हे काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष सय्यद ईसाख भाई नरसीकर, पञकार सय्यद अजीम व लाईनमन सय्यद आदम यांचे ते वडील होते त्यांच्या पाश्चात पत्नी, मुले, सून, मुली, नाती, नातू असा मोठा परीवार आहे .
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या