बिलोली तालुक्यातील हज्जापूर येथे शेळीच्या गोठ्याला आग ; आगीत पंधरा शेळ्या गंभीररित्या भाजल्या !

[ कुंडलवाडी:- अमरनाथ कांबळे ]
      येथून 3 किमी अंतरावर असलेल्या मौजे हज्जापूर येथे दिनांक 7 रोजी दुपारी 1 वाजता सुमारास शेळ्या व मेंढ्यांच्या गोठ्याला आग लागून आगीत 3 शेळ्या व मेंढ्यांचे13 पिल्ले गंभीररित्या भाजून जखमी झाले आहेत…..

               हज्जापुर येथील लक्ष्मण नागोबा गौलोर यांच्या शेळ्याच्या गोठ्याला दिनांक 7 रोजी भर दुपारी 1 वाजताच्या सुमारास मोठी आग लागली या आगीचा भडका एवढं मोठा होता की,त्यात गोठ्यातील 3 शेळ्या व मेंढीचे 13 पिल्ले गंभीर रित्या भाजले आहेत तर आगीच्या भडका आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरलेला पाहून गावकऱ्यांनी कुंडलवाडी येथील अग्निशामन दलाच्या गाडीला पाचारण करून गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियत्रंण मिळविण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

           असे असले तरी सदरील आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या आगीमध्ये शेळ्या व मेंढीचे पालन करणाऱ्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने सदरील घटनास्थळाचे तात्काळ पंचनामा करून सबंधित शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या