सरपंच व ग्रामसेवक आम्ही दोघेही एकमेकांच्या सहमतीने नागरिकांकडून घरपट्टी वसूल केले,वसूल करण्यात आलेली घरपट्टी गावाच्या मूलभूत सोयी-सुविधासाठी खर्च करण्यात आली आहे. यात कुठलाही गैरव्यवहार झाला नाही.
{ सरपंच – सागरबाई चंदनकर }
[ कुंडलवाडी – विशेष प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरापासून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या मौजै हज्जापुर ग्रामपंचायत येथील सरपंच सौ.सागरबाई चंदनकर यांनी गावात ग्रामसेवक तानाजी हांडे यांना न विचारताच गावातील अनेक लोकांच्या घरपट्टया वसुली करुन त्या पैसाचा गैरव्यवहार केल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावे अशी मागणी नागोराव होनपारखे यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी बिलोली यांच्याकडे केली आहे.
हज्जापुर ग्राम पंचायत येथील सरपंच सौ.सागरबाई चंदनकर यांना कोणताच अधिकार नसताना सुध्दा आपल्या सरपंच पदाचा गैरवापर करत ग्रामसेवक तानाजी हांडे यांना न विचारताच गावातील दुर्गादास मारोती चंदनकर,नागोराव केरबा होनपारखे,गंगाधर जळबा वाघमारे, गंगाराम विठ्ठल होनपारखे, गंगाराम मरीबा होनपारखे,सायबू लक्ष्मण होनपारखे,आदीसह गावातील अनेक लोकांकडून घरपट्टी स्वतःच सरपंचांनी वसुली करुन पैसाचा गैरव्यवहार केल्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अन्यथा दि.०५ सप्टेंबर २०२१ रोजी पंचायत समिती कार्यालयसमोर, बिलोली येथे अमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा नागोराव होनपारखे यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी बिलोली यांना एका निवेदनाव्दारे दिला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy