हानमंत लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले !

(विशेष प्रतिनिधी / रियाज पठान)
शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हानमंत लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळीस प्रमुख उपस्थित आमदार मोहनराव हबर्डे, शिवा संघटना प्रमुख मनोहर धोंडे सर हे शिबीरात उपस्थित होते.
प्रजासेना चे तालुकाध्यक्ष दत्ता कुरवाडे यांनी रक्तदान केले.
उपस्थित सचिन निदानकर, नितीन सावळे रियाज पठान, हे शिबीरात होते.
त्यास प्रतिसाद देत शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हानमंत लांडगे यांनी सगळ्या खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आणि 119 रक्त दात्यांने रक्तदान केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या