बेंद्री येथे हर घर जल योजनेचा शुभारंभ खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
बेंद्री येथे ग्रामपंचायत हर घर जल योजनेचा शुभारंभ सोहळा व खासदार नेते लेखाशीर्ष 25, 15 सीसी रस्त्याचे उद्घाटन जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विशेष उपस्थिती आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष भाजपा व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राजेश देशमुख कुंटूरकर प्रवीण पाटील चिखलीकर, शिवराज पाटील होटाळकर ,श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, माणिकराव लोहगावे, देविदास पा बोमनाळे, दिलीपराव धर्माधिकारी, भगवानराव लंगडापुरे, उमाकांत देशपांडे, विनायकराव शिंदे, प्रभावती कत्ते गजानन चव्हाण व्यंकटराव चव्हाण ,धनराज शिरोळे,भाऊ पाटील चव्हाण गंगाधर पा कल्याण, शिवाजी पा वडजे, शिवा पा गाडेकर, माधव पा कल्याण, जीवण पा चव्हाण चंदू पाटील चव्हाण, राजू बेळगे, यांच्यासह पत्रकार प्रमुख मान्यवर व प्रशासकीय अधिकारी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मान्यवरांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य ढोल ताशाच्या गजरात आतिश बाजी करत फुले उधळून खारीक खोबऱ्याचा हार घालून थाटात सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातून भारत देशातील खेड्यापाड्या शहरासह नागरिक पाणीटंचाईच्या काळात वंचित राहू नये म्हणून हर घर जल या योजनेचा कोट्यावधी रुपयाचा नेते देण्याचा संकल्प केल्यामुळे आज या योजनेचा शुभारंभ आम्ही करत आहोत बेंद्रीचे सरपंच सचिन बेंद्रीकर यांचे कार्य सर्व लोकप्रतिनिधींच्या तोंडून उल्लेखनीय असल्यामुळे आम्ही बेंद्रेच्या विकासासाठी कसल्याही प्रकारच्या निधी कमी पडू देणार नाही असे मत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख मान्यवर यांनी कार्यक्रमात आपले विचार गावकऱ्यांच्या उपस्थितीत व्यक्त केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या