कुंडलवाडी शहरात तिरंगा पद यात्रा रॅलीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 येथील शहरात स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त दि.१४ ऑगस्ट रोजी शहरातील मुख्य रस्त्याने युवक एकता तिरंगा पद यात्रा रॅली काढण्यात आली.

यावेळी सोसायटीचे मा.चेअरमन साईनाथ उत्तरवार, मा.उपाध्यक्ष शैलेश-याकावार, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे, पोलिस सपोनी. करीमखान पठाण, उपनिरीक्षक विशाल सुर्यंवंशी, भिम पोतनकर, अमरनाथ कांबळे, साईनाथ भोरे, बंटी साठे, राजू माहेवार, राजू दुप्तले, गंगाधर गंगोणे, आदीच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन दुपारी 12: 30 वाजता रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी या रॅलीत पाचशे मीटर लांबीचा तिरंगा ध्वज तरुणांनी हातात घेऊन शहरातील बसस्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौक-गोपीनाथ मुंडे चौक-हेडगेवार-चौक संत गोरोबा चौक-जोड मारोती मंदिर-कुंडलेश्वर मंदिर,मंडगे यांच्या घरापासून पुन्हा,जोड मारोती मंदीर,बाजार लाईन, व्यंकटेश मंदिर , वंजार गल्ली ते पोलीस ठाणे पर्यंत पद यात्रा काढून या रॅलीचा समारोप करण्यात आले.या रॅलीत देशभक्तीपर गीत,भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणेने संपूर्ण शहर दुमदुमले होते.
यावेळी या रॅलीला शहरातील तरूणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते.हि रॅली यशस्वी करण्यासाठी शहरातील एकता युवक मंडळाच्या तरुणांनी परिश्रम घेतले आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या