माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करून नायगाव शहरात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सुरुवात !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी : गजानन चौधरी ]
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळ व नायगाव नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नायगाव शहरात मा.आ.वसंतराव पा.चव्हाण यांच्या हस्ते ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा शुभारंभ करून उपक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी नागरिकांनी सदर मोहिमेत सहभागी होऊन आपल्याला घरावर तिरंगा फडकावा व या क्षणाचे ऐतिहासिक साक्षीदार व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे शासनाच्या आदेशानुसार सदर मोहिमे अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येणार असून यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दिसत आहे.
याचाच एक भाग म्हणून नायगाव येथे मा.आ.वसंतराव पा.चव्हाण मित्र मंडळ व नायगाव नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नायगाव शहरात दि.१३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येणार असून माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करून सदर मोहिमेस सुरवात करण्यात आली आहे‌.
यावेळी नायगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण पा.जाधव,प्राचार्य डॉ.हरिबाबू सर यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी सर्व नगरसेवक, नगर पंचायतचे कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या