हर घर तिरंगा अभियानासाठी व्हॅन द्वारे नायगाव तालुक्यात जनजागृती 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी नायगाव तालुक्यात जनजागृती व्हावी यासाठी जनजागृती व्हॅनाचे उदघाटन तहसीलदार गजानन शिदे व गटविकासाधिकारी एन.ए.वाजे यांच्या हस्ते करून पाठविण्यात आले.
     आपल्या देशात स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त शासकीय निमशासकीय स्तरावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. 
           शासनाच्या आदेशा प्रमाणे नायगाव चे तहसीलदार गंजानन शिदे व गटविकासाधिकारी एन ए.वाजे यांनी अधिका-यांसह कर्मचा-यांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन नायगाव तालुक्यातील घर घर ध्वज फडकविण्यात यावे यासाठी प्रयत्न केले जात आहे.
 नायगाव तालुक्यातील ८९ गावातील ३९ हजार ७७९ घरावंर दि.१३ ते १५ या तीन दिवसात राष्ट्र ध्वज फडकविण्यात यावे त्या अनुषंगाने गावा गावात जनजागृती झाली पाहिजे.
या साठी नायगाव चे तहसीलदार गंजानन शिदे व गटविकास अधिकारी एन ए.वाजे यांच्या हस्ते उदघाटन करून हर घर तिरंगा जनजागृती व्हॅन बुधवारी सकाळी ११ वाजता नायगाव तहसील हुन तालुक्यात पाठविण्यात आली.
यावेळी मंडळधिकारी डि.डी.कळकेकर, नवाज शेख, तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पा.जाधव, बालाजी राठोड , शाम मुंडे व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थिती होते .
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या