आज इकळीमाळ येथे श्री संत परमेश्वर महाराज यांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील ईकळीमाळ येथे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या श्री साईबाबांचे शिष्य श्री संत परमेश्वर महाराज यांची 44 वी पुण्यतिथी मूर्ती स्थापनेचा प्रथम वर्धापन दिन श्रीराम जन्मोत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मौजे इकलीमाळ येथे कार्यक्रमाने आयोजन. भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या ईकलीमाळ येथील परमेश्वर महाराज संस्थांच्या वतीने राम जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा निमित्तानेदिनांक 22 मार्च 2023 बुधवार रोजी ते 31 मार्च 2023 शुक्रवार पर्यंत विविध कार्यक्रमाने आयोजित केले आहे ह भ प श्री सिताराम प्रभू बुऱ्हाणपूरकर मध्यप्रदेश, ह भ प श्री शिवशंकर महाराज नागपूरकर, ह भ प श्री तानाजी महाराज जाधव कृष्णूरकर, यांच्या हस्ते कलश व विना पूजन करून सप्ताह प्रारंभ होईल.
यानिमित्ताने दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी सात ते अकरा गाथा पारायण, सकाळी 11 ते 12 गाथा भजन, दुपारी 4 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, 8.30 ते 11 हरिकीर्तन, होणार असून या निमित्ताने दिनांक 22 मार्च रोजी हरिभक्त पारायण त्रिंबक आप्पा स्वामी नांदगावकर यांचे कीर्तन , दिनांक 23 मार्च रोजी गुरुवारी हरिभक्त चंद्रकांत महाराज लाटकर उस्मान नगर यांचे कीर्तन, दिनांक 24 मार्च शुक्रवार रोजी ह भ प चैतन्य महाराज राऊत बाल कीर्तनकार यांचे कीर्तन, दिनांक 25 मार्च शनिवार रोजी हरिभक्त पारायण शिवव्याख्याते कबीर महाराज आतार सिंहगड पुणे यांचे कीर्तन, दिनांक 27 मार्च सोमवार रोजी हभप शिवा महाराज बावस्कर यांचे कीर्तन, दिनांक 28 मार्च रोजी मंगळवारी ह भ प विशाल महाराज खोले यांचे कीर्तन, दिनांक 29 मार्च रोजी बुधवारी ह भ प आदिनाथ महाराज लाड यांचे कीर्तन , दिनांक 30 मार्च गुरुवार रोजी सकाळी राम जन्मोत्सव 9 ते 12 ह भ प रामायणाचार्य समाधान महाराज भोजेगावकर यांचे कीर्तन, दिनांक 31 मार्च रोजी शुक्रवारी काल्याचे किर्तन सकाळी 10ते 12 सोपान महाराज सानप शास्त्री हिंगोली यांचे कीर्तन होणार आहे. या कीर्तनामध्ये तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत पर्वतेश्वर महाराज संस्थान येथे इकलीमाळ व गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या