हरजिंदर सिंघ संधू सदैव आपल्या धारदार लेखणीतुन लोकशाही ही भक्कम होत राहो व उत्तम सामाजिक कार्य घडत राहो : संजीवकुमार गायकवाड

( विशेष प्रतिनिधी  /  रियाज पठान )
लाेकशाहीचे चाैथे आधारस्तंभ श्री माननीय इजिं.हरजिंदर सिंघ संधू साहेब दै.हिंदुसम्राट शहर प्रतिनिधी, दै.कुलस्वामिनी प्रतिनिधी, जिल्हा सरचिटणीस संपादक पत्रकार सेवा संघ नांदेड व सक्रिय सामाजसेवक यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा
          लाेकशाहीचा अविभाज्य अंग व लाेकशाहीचा चाैथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार.  पत्रकारांसाठी, सत्य शोधणे हे नेहमीच अंतिम ध्येय आसते. व तसेच लाेकशाही टिकवुन ठेवण्याची सर्वस्व जबाबदारी हि पत्रकारीतेची आसते.
         लाेकशाही हि तेंव्हा सशक्त हाेवु शकते,  जेंव्हा सामाजिक दायित्वांनप्रती पत्रकार हे कार्य करतात.  प्रशासन आणि समाज या दाेन्हीतला दुवा म्हणजे पत्रकारीता.  क्रांतीतले संचार व क्रांतीचे मुळ उगमस्थान म्हणजेच पत्रकारीता.
         निर्भिडपणे चुकीचा विराेध स्वतःच्या धारदार लेखणीतुन करुन, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा प्रश्न हरजिंदर सिंघ संधू सर वेळाेवेळी मांडतच असतात.          
          एक प्रयत्नशील, सुपरिचित, सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आशी सरांची ओळख आहे. समाजात वावरताना समाजाच्या नित्य प्रवाहाशी समजुत करून आपण आपले जिवन जगत असताे व आलेला प्रत्येक दिवस व उगवलेला प्रत्येक सुर्य कसा मावळेल वा कसा मावळला याचा विचार करण्याची व करण्यासाठी आपल्याजवळ मुळी वेळच नसताे. 
     कारण आपण आपल्या संसाराची सावरा-सावर करण्यात ईतके मग्न वा तांत्रिक भाषेत म्हणावे तर एकनिष्ठ झालेले असताे की,  आपल्याला आपल्या संसारा व्यतरीक्त ईतर गाेष्टींनकडे लक्ष देण्यासाठी व ईतर गाेष्टींनवर विचार करण्यास रीकामा वेळच नसताे.   
        पण समाजात असे कांही व्यक्तीमत्व असतात की,  ज्यांना समाजाच्या प्रती सदैव आत्मिय तळमळ असते अश्या व्यक्ती ज्या की,  बुध्दीजीवी व बुध्दीनिष्ठपणे निस्वार्थ कर्म करण्यासाठी सदैव तत्पर असतात अश्या व्यक्ती क्वचितच पाहण्यास मिळतात व तसेच अनुभवण्यास मिळतात असेच एक निस्वार्थ कर्मयाेगी म्हणजे
           माननिय हरजिंदर सिंघ संधू सर आपण जर ठरवल की, सुर्याला उपमा द्यावी. पण कश्याची…? 
हा मुळ प्रश्न सहज उभा राहताे.  तसेच कांही संधू सरांन बद्दल बाेलताना हाेते.
         नवरत्नातले एक निवडक रत्न म्हणजे हरजिंदर सिंघ संधू सर.
      हरजिंदर सिंघ संधू सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व ईश्वर आपणास निराेगी आयुष्य देवाे हि त्यांच्या चरणी प्रार्थना  
सदैव आपल्या धारदार लेखणीतुन लाेकशाही हि भक्कम हाेत राहाे हि सदिच्छा असे प्रतिपादन संजीवकुमार गायकवाड जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या