हरणाळा ते कोळगाव रोडची दुतर्फी झाडे झुडपे काढली !

[ कारेगाव फाटा – आनंद सुर्यवंशी ]
आमदार जितेश अंतापुरकर यांच्या आदेशाचे पालन. कारेगाव फाटा प्रतिनिधी. गेल्या दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरणाचे काम झाले मात्र हरणाळा ते कोळगाव या रस्त्याच्या कडेलगत दूधर्फी काटेरी झाडे झुडपे वाढले होते. ही बाब आमदार जितेश अंतापुरकर यांच्या लक्षात आणून दिली असता आमदार जितेश अंतापुरकर यांनी विभागाचे उपकार्यकारी अभियंता महामुनी यांना आदेशित करून रोड लगतचे झाडे झुडपे काढल्याने दोन्ही गावकऱ्यात समाधान व्यक्त केल्या जात आहे.

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत हरणाला ते कोळगाव अंतर अडीच किलोमीटर असून गेल्या दोन वर्षांपूर्वी डांबरीकरणाचे काम झाले पण दुतर्फी बाजूने काटेरी झाडे झुडपे वाढली होती देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी लक्ष घालून पंतप्रधान ग्राम सडक योजने विभागाचे उपकार्यकारी अभियंता महामुनी जोंधळे यांना आदेशित करून सर्व काटेरी झाडेझुडपे जेसीबीने साफ केले आहे त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी रस्ता सोयीचा झाला आहे. झाडे झुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन दिसत नव्हती त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते यापूर्वी दोन ते तीन अपघात झाले होते देगलूर बिलोली आमदार जितेश अंतापुरकर यांनी वेळीच लक्ष घालून काम केल्याने आमदार महोदयाचे दोन्ही गाव मध्ये गावकरी व इतर नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या