मुख्याध्यापक उत्तमराव राठोड सेवानिवृत्त !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव सखाराम राठोड हे जवळपास 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानानुसार दिनांक 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. उत्तमराव राठोड हे मिलिंद विद्यालयात 27 जुलै 1987 रोजी सहशिक्षक म्हणून रुजू झाले तेव्हापासून ते आजतागायत पर्यंत त्यांनी इंग्रजी विषयाच्या ज्ञानार्जनातुन अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहेत.
त्यांनी संपूर्ण शिक्षकीपेशे मध्ये एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ख्याती मिळवली होते,त्यामुळेच मिलिंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याकडून त्यांच्या सेवापुर्ती निमित्त निरोप समारंभाचा व सत्काराचा कार्यक्रम 31 रोजी विठ्ठल साई मंदिर येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
अशा विध्यार्थीप्रिय शिक्षकाच्या सेवापुर्ती निमित्य व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कुणाल एस लोहगावकर, माजी उपाध्यक्ष अशोक कांबळे, पानसरे महाविद्यालयचे उपाध्यक्ष राजेश्वर उत्तरवार, सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, प्रसिद्ध व्यापारी दिनेश दाचावार, डॉ प्रशांत सब्बनवार, डॉ तानाजी सूर्यवंशी, उद्धवराव चव्हाण, प्रकाश चव्हाण, विश्वनाथ राठोड, प्राचार्य एच बी राठोड, रामराव राठोड, माजी मुख्याध्यापक एन जी देवकरे, एनजी वाघमोडे, एम ए खदिर, आदीसह अनेक नातेवाईक, माजी विधार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या