स्वा.सै.कै उद्धवराव मेडेवार यांच्या स्मरणार्थ शिबिरात नागरिकांचा प्रतिसाद !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील प्रसिद्ध उद्योगपती स्वातंत्र्यसैनिक उद्धवराव मेडेवार यांच्या स्मरणार्थ मेडेवार परिवारांच्या वतीने ॲक्युप्रेशर नैसर्गिक चिकिस्ता पद्धतीद्वारे सप्ताह साप्ताहिक उपचार शिबिर आयोजित करण्यात आल्यामुळे या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी गर्दी करीत आहेत.

नायगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती स्वातंत्र्य सैनिका कैलासवासी उद्धवराव मेडेवार यांच्या स्मरणार्थ मेडेवार परिवाराच्या वतीने श्रीराम सा मेडेवार ,वसंत सा मेडेवार, राजेश्वर सा मेडेवार, सदानंद सा. मेडेवार यांच्यावतीने नायगाव येथे ॲक्युप्रेशर नैसर्गिक चिकिस्ताच्या पद्धती द्वारे साप्ताहिक उपचार शिबिर आयोजित केले होते.

या शिबिराचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले सदरील शिबिरामध्ये लकवा मारणे, गुडघेदुखी, मान दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, अर्धे डोकेदुखी, फ्रोजन शोल्डर, सायटिका, थायराइड, स्पीडीलिसीस, वजन कमी करणे, लघवीचा त्रास, सांधेदुखी, मणक्यातील दुखणे, हातापायात मुंग्या येणे, बीपी, शुगर, इत्यादी रोग्यावर उपचार करण्यात येत असून औषधी गोळी न घेता ॲक्युप्रेशर च्या पद्धतीने इलाज करण्यासाठी साप्ताहिक फीस म्हणून शंभर रुपये फक्त ठेवण्यात आल्यामुळे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपचार घेत आहेत. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या