कुंडलवाडीत महाआरोग्य शिबीराचे आयोजन ; माजी नगरसेविका शकुंतलाबाई खेळगे यांचा पुढाकार !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ] 
        येथील नगरपालिकेच्या माजी नगरसेविका शकुंतला गंगाधरराव खेळगे व डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदींच्या मार्फत मोफत महाआरोग्य शिबीर दि १० में रोजी अशोक प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आले.

           यात रुग्णाची तपासणी, उपचार व तज्ञ डॉक्टरचे ग्रुप मार्गदर्शन लाभणार असून डॉ सचिन आनेवार, डॉ.नितीन शेट्टे, डॉ दिनेश प्रतापवार, डॉ. सुधाकर बंटेवाङ, डॉ विक्रम मनुरे, डॉ.संदीप उपोड, डॉ.नीलेश बास्टेवाड़, डॉ रोहीत ठक्करवाड़,  डॉ प्रल्हाद राठोड, डॉ सपंदा रोहित ठककरवाड, डॉ सातमवाड़, डॉ विश्वनाथ मलशेटवार यांची उपस्थिति लाभनार असून या कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानी माजी खासदार भास्करराव पा खतगावकर, उद्घाटक डॉ मीनलताई खतगावकर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जीतेश अंतापूरकर तर मार्गदर्शक म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ एस एस शेगुलवार, माजी सभापती बाबाराव पाटील भाले, मा नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, यांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी कुंडलवाडी व परिसरातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजका कडून करण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या