मांदाटने ग्रुप ग्राम पंचायतच्या मार्फ़त नागरिकांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शनाचे आयोजन !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
ग्रुप ग्राम पंचायत मांदाटने तालुका म्हसळा जिल्हा रायगड यांच्या वतीने दिनांक 12/10/2021 रोजी सकाळी 10 वाजता आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून. या मार्गदर्शन शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहूण लाभ घ्यावा असे आवाहन ग्रुप ग्राम पंचायत मांदाटने यांच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यात आदर्श ग्रामपंचायती कड़े वाटचाल करत असलेली ग्रामपंचा यत म्हणुन मांदाटने ग्रामपंचायत कड़े पाहिले जात आहे.
मांदाटने ग्रामपंच्यातचे सरपंच श्री चंद्रकांत लक्ष्मण पवार उप सरपंच धनश्री मं मुंडे सदस्य भिकू बा डोंगरे, शंकर रा गोरीवले, नीता सु पवार, शुभांगी सं शिगवण, मीनाक्षी वि मानवे, शेफाली स लाड, प्रज्ञा प दिवेकर, शांताराम ल खैरे यांनी तसेचग्रुप ग्राम पंचायत मांदाटने च्या वतीने एक पाऊल आरोग्य धनसंपदाम या उक्ति प्रमाणे कोरोनामय परिस्थिती असताना आपल्या वाड़ीवस्तीतुन कोरोनाला हद्दपार केलेले आहे.
कोरोनामुक्त ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे सद्याच्या काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याकड़े जास्त लक्ष देणे गरजेचे आहे जीवनाव् श्यक काहीच नाही जीवन आवश्यक आहे. वेळेची आणि शरीराची, आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणुन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व् मार्गदर्शक श्री प्रमोदकुमार मिश्रा साहेब चिपळून व शौकिया मँडम महाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत तरी ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावे असे सरपंच श्री चंद्रकांत पवार, ग्रामसेवक श्री पी बी ठाकरे यांच्या वतीने जाहिर आवाहन करण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या