आरोग्याची काळजी घेणे हे काळाची अत्यंत म्हत्वाची गरज आहे – आयुर्वेदाचार्य श्री प्रमोद कुमार मिश्रा !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा तालुक्यातील अत्यंत नावाजलेली, परीचित अशी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली मांदाटणे ग्रुप ग्रामपंचायत मार्फ़त अनेक नाविनयपूर्ण कार्यक्र्म, नागरीकां साठी वेगवेगळ्या योजनाची माहिती असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून मांदाटणे ग्रुप ग्रामपंचायत ने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करुण नागरिकांच्या आरोग्यविषयी समस्याचे निवारण कश्या पद्धतीने करता येईल यासाठी शिबिर आयोजित केले होते.

या प्रसंगी प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य श्री प्रमोद मिश्रा साहेबांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की आरोग्याची काळजी घेणे हे सद्याच्या काळात अत्यंत म्हत्वाचे झालेले आहे. कोरोना सारख्या भयानक भीतीच्या वातावरणाने जनसामन्याचे स्वास्थ पूर्णपणे बिघडून गेले आहे. अशा परिस्थितत आरोग्याकडे कोणीही हलगर्जीपणा करु नये. तब्येतीची काळजी घ्यावी. चांगला आहार घ्यावा, इम्युनिटी वाढेल.

या प्रसंगी शौकिया मॅडम महाड यांनी ही नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषदचे कृषी व पशुसवर्धन सभापति श्री.बबन मनवे साहेब यानी फोन करुण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सरपंच श्री चंद्रकांत पवार, ग्रामसेवक श्री ठाकरे, सदस्य, उपस्थित होते. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या