बिलोली उपजिल्हा रुग्णालयात आज तणाव मुक्त शिबिराचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा – वैद्यकिय अधीक्षक डॉ. लखमावाड

● व्यसनमुक्ति, चिंता, नैराश्य, ताण, तनाव मानसिक रोग आजारावर तपासणी होणार !

( बिलोली ता.प्र.सुनिल जेठे)
श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रूग्णालय नांदेड च्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार उपजिल्हा रुग्णालय बिलोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमाचे आयोजन
आज दि 27 डिसम्बर रोजी मंगळवारी सकाळी 10 ते 2 वाजता या वेळेत करण्यात आले आहे.
 बिलोली तालुक्यातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय बिलोलो येथे नाव नोंदणी करण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत करून तपासणी करून घ्यावी तसेच या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे. या शिबिरात चिंता, नैराश्य, झोप न येणे, व्यसनाधीनता, जुनाट डोकेदुखी, झटके येणे, करणी, भानामती, स्किझोफ्रेनिया, काल्पनिक आवाज ऐकू येणे, अकारण मतिमंदत्व, विस्मरण, लहान मुलांमधील किंवा शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले मानसिक ताण तणाव, तसेच अनेक मानसिक आजार व समस्येवर नांदेड येथील डॉ. शाहू शिराढोणकर , डॉ. अरुण वाघमारे,सुधा टेकुले,वंदना सोलोंके तसेच मानसोपचार व तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या शिबीराचे लाभ घेऊन रोग मुक्त व्हावे असे मा.नागेश लखमार यांनी आव्हान केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या