स्वा.सै.कै. उद्धवराव मेडेवार यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील प्रसिद्ध उद्योगपती स्वातंत्र्यसैनिक उद्धवराव मेडेवार यांच्या स्मरणार्थ मेडेवार परिवाराच्या वतीने ॲक्युप्रेशर नैसर्गिक चिकिस्ता पद्धतीद्वारे साप्ताहिक उपचार शिबिर आयोजित केले आहे.
नायगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी उद्धवराव मेडेवार यांच्या स्मरणार्थ मेडेवार परिवाराच्या वतीने नायगाव येथे ॲक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीद्वारे साप्ताहिक उपचार शिबिर आयोजित केले असून सदरील शिबिर दिनांक 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
त्याचे ठिकाण नवीन मेडेवार मार्केट, कृष्णा सुपर मार्केट च्या बाजूला असून या शिबिरामध्ये लकवा मारणे, गुडघेदुखी, मान दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, अर्धे डोकेदुखी, फ्रोजन शोल्डर , सायटिका, थायराइड, स्पीडीलिसीस, वजन कमी करणे, लघवीचा त्रास, सांधेदुखी, मणक्यातील दुखणे, हातापायात मुंग्या येणे, बीपी, शुगर, इत्यादी रोगांवर उपचार करण्यात येत असून औषधी गोळी न घेता ॲक्युप्रेशर च्या पद्धतीने इलाज करण्यात येणार आहे.
यासाठी फक्त साप्ताहिक फीस म्हणून शंभर रुपये फक्त राहणार आहे. तरी नायगाव तालुक्यातील सर्व रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा. असे आवाहन नायगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम सावकार मेडेवार, वसंत सावकार मेडेवार, राजेश्वर सावकार मेडेवार, सदानंद सावकार मेडेवार, व संपूर्ण मेडेवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या