देगलुर-बिलोली मतदार संघात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी व इतर पिकांचे नुकसान; पंचानामे करुन शेतकर्‍यांना हेक्टरी ४० हजार मदत करा – जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन ।

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
 दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७-८ दरम्यान देगलुर बिलोली मतदार संघात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस व सोबतच गारपीट झाली. यात रब्बी पिकासह भाजीपाले,  फळबाग याचे अतोनात नुकसान झाले आहे.
अगोदर खरीप पिकावेळेस सतत मुसळधार पाऊस पडुन शेतकर्‍याचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर यातच भर म्हणुन पुन्हा २९ डिसेबंर रोजी राञी अवकाळी पाउस व गारपीटीमूळे शेतकर्‍यांचे नूकसान झाले आहे. या मुळे देगलुर-बिलोली मतदासंघातील नुकसान झालेल्या शेतकर्‍याच्या पिकाचे पंचनामे करुन तात्काळ हेक्टरी ४० हजार मदत द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी ईमेल द्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

 

तसेच माहितीस्तव मुख्यंमञी, विभागीय आयुक्त, उपजिल्हाधिकारी यांनाही कळवले आहे. तर प्रशासनाने त्वरीच पंचनामे करुन शेतकर्‍यांना नूकसान भरपाई न दिल्यास पुढील काळात शेतकर्‍यांना सोबत घेऊन जनआंदोलन करण्याचा गांभिर्याचा ईशारा हि वंचित बहुजन आडीचे जिल्हा उपाध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य शंकर महाजन यांनी दिला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या