करखेली येथील तलाव/बांध फुटल्याने मौजे चोळाखा,चौंडी येथील जनता भयभीत.

आज दि.१५-सप्टे-२०२०

अचानक वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोयाबीनच/उडीद/कापुस व उस पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
एवढंच नाही तर चोळाख्याला दोन्ही बाजूला असलेल्या दोन नाल्यांनी कहरच केला.

आतापर्यंत जवळपास दोन/तीन वर्षांत नाही एवढे तुडुंब दुतर्फा पुलावरून पाणी वाहून जात आहे.

एवढेच नव्हे तर या नाल्याच्या अथांग पाण्यामुळे धर्माबाद खारेगाव रोड आज दुपारी २पासुन रहदारी बंद आहे.असे समजते की,करखेली येथील तलाव फुटलेले आहे.


प्रत्यक्ष जनतेला कांहीच माहीत नाही पण ओढ्याकाठी असलेल्या चोळाखा, चौंडी येथील शेतातील खोप्या,जनावरांचे आखाडे असणारी शेतकरी मात्र भयभीत झाले आहेत.

पायथ्याशी गोदावरी अथांग भरलेली नदी, फुटलेले करखेलीचे तळे ,पडणारे पावसाचे वादळी पाऊस यामुळे जनता भयभीत झाली आहे.

व पुढील दक्षतेसाठी शासनाने जनतेला सतर्क करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

– डी.बी.पाटील चोळाखेकर

ताज्या बातम्या