हेक्टरी 50 हजार मदत द्या; जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
नांदेड जिल्ह्यातील 85 महसूल मंडळात ढगफुटीमुळे अतिवृष्टी झाली आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे हेक्टरी 50 हजार रूपयांची शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केली आहे.
तसेच या मागणीसंदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, पालकमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली दि. 14 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजवला. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील 85 महसूल मंडळात ढगफुटीमुळे अतिवृष्टी झाली.
नदी, नाल्या महापूर आल्याने शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून गेल्या. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील लोहा, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, किनवट, नायगाव, उमरी व अन्य तालुक्यात ढगफुटीमुळे अतिवृष्टी होऊन 4 लाख 36 हजार 359 शेतकर्‍यांच्या 3 लाख 51 हजार 617 हेक्टर शेतामधील पिकांचे नुकसान झाले.
महापूरामुळे रस्ते खरडून गेली, पशुधनाचे नुकसान झाले, घरांची पडझड झाली, जमिनी रखडून गेल्या, त्यामुळे हेक्टरी 50 हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी.
तसेच शेतकर्‍यांच्या पिकविम्याची सरसगट रक्कम मिळवून द्यावी. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या जमिनी दुरूस्त करून द्याव्यात, तसेच डेंग्यु व साथीच्या रोगाने थैमान घातल्यामुळे संबंधितांना उपाययोजनांसाठी त्वरीत आदेशीत करावे असे दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष भोसीकर यांनी मागणी केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, माजी सभापती भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, रमेश देशमुख शिळवणीकर, भगवानराव पाटील आलेगावकर, गफार खान, कल्पनाताई डोंगळीकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे, मधुकरराव पाटील पिंपळगावकर, रमेश गांजापूरकर, गजानन पांपटवार, डॉ. विक्रम देशमुख, विठ्ठलराव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, बालाजी शेळके, तालुकाध्यक्ष उत्तमराव पाटील आलेगावकर, प्रा. मजरोद्दीन, धनंजय सुर्यवंशी, शिला बोंबले, माधव पवार, देवराव टिपरसे, रामदास पाटील, शिवानंद शिप्परकर, आत्माराम कपाटे, शेख साबेर, विठ्ठल पाटील, ओमप्रकाश पत्रे, पांडूरंग गोरठेकर, उद्धव वीजगोरे, खेळगे नागनाथ, शीला पाचपुते, कुसूम देशमुख, सुनंदा पाटील जोगदंड, लक्ष्मीकांत पदमवार, अंकुश देसाई, संदीप राऊत, चंद्रकांत टेकाळे, योगेश पाटील, शरद जोशी यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या