“स्वयं शिक्षण प्रयोग”ची गरीबांना थेट मदत !

(विशेष प्रतिनिधी-रियाज पठान)
“स्वयं शिक्षण प्रयोग नांदेड कडून 200 अतिगरीब कुटुंबांना अन्नधान्य किटचे वितरण”नुकतीच नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोनखेड यांच्या कार्यक्षेत्रातील 30 गावामध्ये आरोग्य पोषण आहारकार्यक्रमांतर्गत आरोग्य सखीच्या माध्यमातून गाव पातळीवर काम करत आहे.
स्वयं शिक्षण प्रयोग नांदेड हि सामाजिक संस्था इ.स.2020 पासून कोरोना कालावधीत अखंड पणे विविध समाजोपयोगी कामे करत आहे.स्वयं शिक्षण प्रयोग व कमल उदवाडीया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संदर्भात गरोदर माता, पाच वर्षाच्या आतील बालके, किशोरवयीन मुली, वैयक्तिक कौटुंबिक सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य गट , व्यवसाय या विषयावर संस्थेच्या अंतर्गत गाव पातळीवर काम करणाऱ्या आरोग्य सखी व तालुका समन्वयक, प्रोग्रॅम मॅनेजर यांच्यामार्फत गाव, परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर बैठका , प्रशिक्षणे, मेळावे यामधून कामाची देवाण-घेवाण केली जाते.
सदरील कार्यात संस्थेच्या संचालिका प्रेमा गोपालन यांनी लॉकडाऊनच्या काळात 30 गावातील अतिगरीब कुटुंबाचा आरोग्य सखींमार्फत सर्वे करून घेतला तेव्हा असे लक्षात आले की गावातील अतिगरीब कुटुंबांच्या हाताला काम मिळणे बंद झाले होते तसेच काही कुटुंबांचे छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले होते, कांही कुटुंबांची खाजगी नौकरी गेली होती, दवाखान्यावरील खर्च वाढला होता तसेच घरात व बँकेत शिल्लक असलेला पैसा संपला होता म्हणून नंतर अतिगरीब कुटुंबे, विधवा, परितक्त्या, अपंग, भूमिहीन कुटुंबांना अन्नधान्य किट संस्थेकडून देण्याचे ठरले.
मदतीच्या ठिकाणात प्रामुख्याने शेवडी तांडा 25, मडकी 17, बामणी 25, बोरगाव 16, दापशेड 31, दगडगाव 14, पिंपळगाव येवला 18, बेटसांगवी 2, कपिलेश्वर बेटसांगवी 22, आंबेसांगवी येथील 11, इत्यादी एकूण 10 गावातील 200 कुटुंबांना अन्नधान्य किट दिनांक 21 व 22 में 2021 रोजी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीताई, पोलीस पाटील, कोरोना सहाय्यता समिती सदस्य, बचत गटातील सदस्य, कृषी गटातील सदस्य, लिडर महिला, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या शुभहस्ते अतिगरीब व इतर कुटुंबांना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी स्वयं शिक्षण प्रयोग नांदेडचे प्रोग्राम मॅनेजर श्री. राजाभाऊ जाधव,तालुका समन्वयक सौ.रेवती कानगुले व 10 गावातील आरोग्य सखी उपस्थित राहून वितरण पार पडले.

ताज्या बातम्या