आस्मानी संकटात शेतकऱ्यांना गजानन चव्हाण यांचा मदतीचा हात !

[ विषेश / प्रतिनिधी : शिवानंद पांचाळ नायगांवकर ]
राज्यात गेल्या दोन-तीन वर्षापासून शेतकऱ्यावर विविध प्रकारची संकटे कोसळली जात असून यंदाही अतिपावसाने व त्यातील महापुरामुळे शेतकऱ्याची संपूर्ण पिके तर नष्ट झालीच पण कित्येकांची सुपीक शेती देखील वाहून गेली आहे. त्यांना आपल्या परीने थोडाफार दिलासा म्हणून गजानन चव्हाण यांच्या कडून मोफत रब्बीसाठी बियाणे वाटप करण्यात आले आहे.
नायगांव शहरातील सामाजिक कार्यात ज्यांचे नाव चर्चिला जात आहे.
गजानन चव्हाण यांनी आपण एक शेतकरी पुत्र असून त्यांच्या व्यथा काय असतात याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या कार्यालयात भाजपाचे कार्यकारी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे, माजी सभापती तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवराज पा.होटाळकर, नगरसेवक देवीदास पा. बोंमनाळे, भाऊराव पा.चव्हाण, शिवाजी पा.पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा देऊन शेळगाव छत्री येथील शेतकरी उद्धव मालोजी चोंडे व खैरगाव येथील देविदास शामराव शिंपाळे यासह अन्य शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी हरभरा, भेंडी, वांगे, टमाटा, मिरची आधी पिकाचे बियाणे मोफत देऊन आपल्या मनाचा मोठेपणा भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी गजानन पा.चव्हाण यांनी दाखविला असून शेतकरी शेतमजूर व कामगार वर्गासाठी गजानन चव्हाण यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होत खारीच्या वाट्याप्रमाणे आपलाही वाटा ठेवत असल्याची जाणीव नायगाव तालुक्‍यातील कित्येकांना असल्याचे दिसून येते.
यावेळी शिवाजी वडजे, जिवण पा.चव्हाण, राजू सोनकांबळे, सय्यद बाबू, रामकिशन पालनवार, कैलासभाऊ भालेराव, अशोक पवार, प्रदिप देमेवार, अतुल मंगरुळे, साईनाथ देशमुख, साईनाथ सुब्बनवार,विठ्ठल वाघमारे, गणेश देगावे, प्रवीण बिरेवार, दिगंबर चव्हाण, माधव वसंत चव्हाण यासह आदी जणांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या