भारतात विविधतेत एकता निर्माण करण्याची ताकद हिंदी भाषेत –कल्याण गायकवाड

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या विविधतेत एकता निर्माण करण्याची ताकद हिंदी भाषेत असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक कल्याण गायकवाड यांनी केले.
येथील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्रशालेत विद्यार्थीनींच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी कु.कावेरी खराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सृष्टी वानोळे,वैष्णवी घंटेवाड यांच्यासह संस्था सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार, रविकांत शिंदे व प्रा.शंकर पवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कल्याण गायकवाड म्हणाले की, भारतात वेगवेगळ्या गटाचे लोक वेगवेगळी भाषा बोलतात भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा बोलल्या जातात.
या सर्व भाषिकांना जोडण्याची व राष्ट्रीय एकतेचं व एकात्मतेचं प्रतिक असणारी ही केवळ हिंदी भाषा असल्याने आपण सर्वांनी हिंदी भाषा बोलावी असे आवाहन केले. यावेळी डॉ. प्रशांत सब्बनवार, रविकांत शिंदे ,प्रा.शंकर पवार यांच्यासह विद्यार्थीनींची हिंदी भाषेचं महत्त्व प्रतिपादन करणारी भाषणे झाली. हिंदी दिनाच्या निमित्ताने आयोजित वर्गसजावट,निबंध, रांगोळी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थीनींना बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साक्षी वानोळे व स्नेहल तेलंग यांनी केले तर उपस्थितांचे आभार ऐश्वर्या कैवारे हिने मानले.
WWW.MASSMAHARASHTRA.COM 

ताज्या बातम्या