राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी भाषेचे योगदान अतुलनीय आहे – डॉ. प्रभाकर भुमरे !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
भारत देश हा विविध भाषा, प्रांत, जात, धर्म, संप्रदाय या घटकांनी नटलेला असूनही राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी हिंदी भाषेचे योगदान अतुलनीय आहे असे प्रतिपादन शंकरनगर च्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रभाकर भुमरे यांनी शरदचंद्र महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदी दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. शंकर गड्डमवार हे होते. पुढे बोलताना डॉ. भूमरे म्हणाले की, हिंदी भाषामुळे भारताची ओळख होते तर देशाबद्दल अभिमान बाळगण्याचे कार्य राष्ट्रभाषेमुळे होते. राष्ट्रभाषेच्या अभिमानाबद्दल ते उदाहरण देताना म्हणाले की, काम करो ऐसे की आपकी पहचान बन जाए, जिंदगी तो हर कोई काट लेता है मगर आप ऐसा जिओ की एक मिसाल बन जाए.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.हरी बाबू म्हणाले की, व्यापक दृष्टी विकसित करण्यासाठी हिंदीचा स्विकार केलाच पाहीजे त्यामुळे राज्याराज्यातील संकुचित विचार नष्ट होईल. भाषणाचा शेवट करताना करताना आणि हिंदीचे महत्व सांगतांना म्हणाले की, जात न पुछो साधु की, पुछ लो उनकी ज्ञान, मोल करो तलवार की,पडी रहने दो म्यान या ओळीतून त्यांनी महत्व पटवून सांगितले. यावेळी प्रा.डॉ.गड्डमवार यांनीही आपले मनोगत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमूख प्रोफेसर डॉ. श्रीरंग वट्टमवार यांनी केले .डॉ. संजय भालेराव व प्रा.सुभाष भालेराव यांनी मान्यवरांचे स्वागत केले . संचलन कु. श्रुती मंडाळे हिने केले तर आभार प्रा.सुभाष गायकवाड यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या