होळी गुढीपाडव्यानिमित्त खारीक खोबऱ्याच्या हाराची मोठ्या प्रमाणात विक्री !

■ खारीक खोबऱ्याच्या हारामुळे हजारो मजुरांना मिळाला रोजगार            ■ व्यापाऱ्यांची लाखोंची उलाढाल
[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
जुन्या चालीरीती प्रमाणे आजही शहरासह ग्रामीण भागात वडील मुलीला तर भाऊ बहिणीला होळी गुढीपाडवा निमित्ताने खारीक खोबरे साखरेचे हार साडीचोळी घेऊन आपल्या वडील लेकीकडे व भाऊ बहिणीकडे जाऊन तिला विचारपूस करून भावा बहिणीचे वडील मुलीचे प्रेम आजही कायम राखण्याची प्रथा चालू आहे.

दरवर्षी गुढीपाडवा होळीच्या निमित्ताने व्यापाऱ्यांचे खारीक खोबरांच्या व साखरेच्या हारांसाठी एक महिन्यापासून तयारी चालू असते व्यापारी खारीक खोबरे खरेदीसाठी हैदराबाद मुंबई नांदेड सारख्या शहरातून इतर प्रांतातून होलसेल भावात मोठ्या प्रमाणात खरेदी करून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी खारीक खोबरे देऊन त्याचे हार करून घेत असतात. 
त्यामुळे एका मजुराला एका हाराला दीड रुपये याप्रमाणे मजुरी दिली जाते तर एक मजूर मुलं, मुली, महिला,पुरुष, शंभर ,दीडशे, दोनशे , तीनशे, पर्यंत हार तयार करून महिन्याभरामध्ये पाच ते दहा हजार रुपयाची कमाई एका मजुराला आहे एका महिन्यात मजुरी मिळाल्यानंतर आनंदी दिसून येत आहेत.

मजुराकडून करून घेतलेले खारीक खोबऱ्यांचे हारे होलसेल भावात किराणा दुकानदारांना विक्री केली जाते खारीक खोबऱ्याचा हार 180 रुपये किलो ,200 रुपये किलो, 225 रुपये किलो, साखरेचे हारे 80 रुपये किलो याप्रमाणे बाजारपेठेतील विक्री केली जाते दरवर्षी होळी व गुढीपाडवाची चाहूल लागताच ग्रामीण भागातील वडील मुलीसाठी तर भाऊ बहिणीसाठी मोठ्या प्रमाणात आहाराचे खरेदी करून होळीच्या पहिल्या दिवशी आपल्या बहिणीकडे जाऊन सुखदुःखाचे हितगुंज करत विचारपूस करत तिच्यासोबत पुरणपोळीचे जेवण करून आनंद व्यक्त करत निरोप घेऊन येत असतात.
त्यामुळे दरवर्षी मुलगी किंवा बहिण या सणाची आतुरतेने वाट पाहत असते असे प्रकार आजही ग्रामीण भागात चालू असो खोबर्या खारीकच्या साखरेच्या हाराची विक्रीमध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते त्यामुळे दुकानदारांना ग्राहकाकडून मिळालेला फायदा तर मजुरांना रोजगार मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले जाते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या