उमरी येथे व्हॉलीबॉल ग्रुपच्या वतीने धूलीवंदन उत्सव साजरा.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
येथिल यशवंत हायस्कूलच्या मैदानावर व्हाँलीबाँल ग्रुपच्या वतीने शुक्रवारी सकाळी ७ वाजता रंग पंचमी निमित्त सर्व सदस्यांनी एकमेकांना विविध रंगाचे कलर लावून धूलीवंदन उत्सव साधेपणाने साजरा केला.
शुक्रवार दि.१८ मार्च २०२२ रोजी व्हाँलीबॉल ग्रुपचे प्रमुख दिलीप बालासाहेब बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी येथिल यशवंत हायस्कूलच्या मैदानावर चार महिण्या पासून नियमित व्हाँलीबाँलचे सर्व सदस्य खेळाचा सराव करीत आहेत त्या निमित्ताने ग्रुपच्या सदश्यांनी आज रंग पंचमी निमित्त विविध प्रकारचे रंग लावून एकमेकांना शुभेच्छा देवून रंगपंचमीचा आनंद लुटला.
यावेळी डी.डी. बोईनवाड (मु.अ.) बालाजीराव पंतोजी, गणेशराव आनेमवाड, गजानन चव्हाण,बापुराव रिठेकर ( पत्रकार ) माधवराव जाधव, देविदास शेटे, डॉ संतोष ताटे, प्रल्हाद राठोड, चंद्रकांत लोध, पार्थ करपेवाड, बळीराम राठोड, देविदास गोडगे, यादव आरसेवाड, अब्दुल शेख, समाधान गोडगे, साई कस्तुरे, आदित्य सावंत, श्रेयस कदम, संजय आनेराये आदी उपस्थीत होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या