भक्ती गणेश मंडळाच्या वतीने तेलंगणाच्या महापौरांचा सन्मान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील भक्ती गणेश मंडळाच्या वतीने गणेश स्थापनेच्या अनुषंगाने तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्याचे महापौर डी नीतूकिरण व विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे.
कुंडलवाडी येथील भक्ती गणेश मंडळ व साईनाथ धात्रक यांच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्याचे महापौर डी नितुकिरण,महापौर प्रतिनिधी डी शेखर अण्णा, निजामबादचे नगरसेवक धर्मपुरी अण्णा, नारायण अण्णा, देवेंद्र अण्णा, कुंडलवाडीच्या नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण, उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, सोसायटीचे चेरमन साईनाथ उत्तरवार, माजी नगराध्यक्ष भुमन्‍ना ठक्करवाड, नगरसेवक शंकर गोनेलवार, अनिता पुप्पलवार, नगरसेवक प्रतिनिधी पोशटी पडकूटलावार, व्यंकट शिरामे, मोहन गंगोने, डॉ प्रशांत सब्बानवार आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भक्ती गणेश मंडळाचे पदाधिकारी राजेश कळसाईत, अशोक मदनुरवार, लिंगूराम तेलकेश्वर , राजेश जडलावार, गणेश कांबळे, नरसिंग मदनुरवार, सूर्यकांत गुंडाळे, सहीत भक्ती गणेश मंडळाचे इतर कार्यकर्ते व धात्रक परिवारातील साईनाथ धात्रक, आनंद धात्रक यांनी परिश्रम घेतले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या