कुंडलवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील कर्मवीर सेवाभावी संस्थेच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा व आदर्श शिक्षक, आदर्श संस्था चालक आदींचा दिनांक नऊ रोजी के रामलू मंगल कार्यालय येथे सन्मान करून त्यांना गौरवण्यात आले आहे.

कुंडलवाडी शहरातील इयत्ता दहावी मध्ये ९० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, आदर्श संस्था चालक आदींचा कर्मवीर सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक नऊ रोजी के रामलु मंगल कार्यालय येथे सन्मान करून गौरव करण्यात आले आले आहे.सदरील कार्यक्रमात चाळीस पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह,विविध जातीचे वृक्ष, देऊन करून कौतुकाची थाप देण्यात आले तर आदर्श संस्थाचालक म्हणून सायरेड्डी ठक्कुरवाड, आदर्श शिक्षक म्हणून कल्याण गायकवाड, बालाजी गंगोणे, संदीप कामठाणे,यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वैद्यकीय अधिकारी बालाजी सातमवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी अनिता अनमुलवाड, सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, व्हाईस चेअरमन गंगाधर नरावाड, भीम पोतनकर, सायरडी पूप्पलवार, संगीता मिरगेवार, गंगाप्रसाद गंगोणे, आधीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ नरेश बोधनकर, कारण समेटवार,दत्तू हमंद,अनिल पेंटावार, साईनाथ भोकरे,कैलास मा, शिवकुमार गंगोने ,साईनाथ येपुरवार आधीसह अनेकांनी परिश्रम घेतले आहे.
www.massmaharashtra.com