बाळशास्त्री जांभेकर, कॉ.पानसरे यांना पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन !

[ जयवर्धन भोसीकर ] मराठी पत्र सृष्टीचे जनक अद्य मराठी पत्रकार आचर्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व समाजसेवक कॉ.गोविंद पानसरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ व महानगर पत्रकार संघाच्यावतीने कार्यक्रम घेवून अभिवादन करण्यात आले आहे.
जिल्हा व महानगर मराठी पत्रकार संघाच्यावतीने सायं दै.नांदेड वार्ता कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड.प्रदीप नागापूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
तर यावेळी जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सुधीर प्रधान, कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार, महानगर उपाध्यक्ष अविनाश पाटील, सोशल मिडिया निमंत्रक इंजि.गजानन कानडे, प्रमोद गजभारे, इम्रान खान, गणेश संदुपटला, नागसेन डोंगरे, श्याम कंदारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष व उपस्थित मान्यंवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर व कॉ.गोविंद पानसरे यांच्या प्रतिमांचे पूजन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यंवर बोलतांना म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री यांनी मराठी पत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. दर्पण या वृत्तपत्रातून प्रखर आवाज उठवला. त्यांची पत्रकारिता आजच्या पत्रकारांना प्रेरणादायी आहे. तर सामाजिक कार्यात आपल्या कार्याने आपली ओळख सिध्द करुन आपले समाजसेवेचे कार्य निरंतर केले.
त्यांच्यावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले. या दोन्ही महापुरुषांचं कार्य हे समाज कधीच विसरु शकणार नाही. भावी पिढींनी त्यांच्या कार्याची धुरा खांद्यावर घेवून काम केले पाहिजे, असे आवाहन केले.तसेच ज्येष्ठ पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव प्रकाश कांबळे, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी,गोवर्धन बियाणी यांनी शुभेच्छा दिल्या. शेवटी सुभाष लोणे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या