कोविड लसीकरण मोहिमेत काम केलेल्या गणेश मंडळाचा सन्मान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गणेश उत्सवाच्या कालखंडात कोविड विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती, त्यामध्ये ज्या गणेश मंडळाने सर्वाधिक कोविड लसीकरण करून घेतले अशा गणेश मंडळाचा सन्मान दिनांक 23 रोजी करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी अंतर्गत असलेल्या गावामध्ये गणेश उत्सवाच्या कालखंडात कोविड विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती, यामध्ये ज्या गणेश मंडळाने सर्वाधिक लसीकरण करून घेतील आशा गणेश मंडळांना आरोग्य विभागाच्या वतीने पारितोषिक देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने दिनांक 23 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला,त्यामध्ये सर्वप्रथम पारितोषिक वंजारी समाज व स्वराज्य गणेश मंडळ, द्वितीय पारितोषिक विद्यार्थी गणेश मंडळ, तृतीय पारितोषिक शारदोपासक गणेश मंडळ यांना जाहीर करुन त्यांचा सन्मान करण्यात आला,तर विशेष सन्मान म्हणून गणेश उत्सवाच्या कालखंडात कोविंड देखावा दाखवून नागरिकांमध्ये जनजागृती केल्याबद्दल भक्ती गणेश मंडळ,नेत्र चिकित्सा शिबीर घेतल्याबद्दल बळीराजा गणेश मंडळ, लोकांना लस घेण्यास प्रवर्तन केल्याबद्दल अमरनाथ कांबळे मित्र मंडळ,अर्जापुर येथे नागरिकांना लस घेण्यास जनजागृती केल्याबद्दल सहशिक्षक शेख सलीम,जोशी सर,शेख साजिद आदीचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
 यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगरपालिका उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी देवराय सर,मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे,सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे, डॉ प्रतिभा होनशेट्टे, डॉ नरेश बोधनकर,विलास दिवशीकर,संतोष चव्हाण,आदीसह आरोग्य कर्मचारी, पत्रकार ,गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

Subscribe/सबस्क्राईब

ताज्या बातम्या