कुंडलवाडी येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सामाजिक कार्यकर्ते व्यंकट शिरामे यांच्या वतीने कोरोनाच्या काळाखंडात आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलेल्या आरोग्य विभाग कर्मचारी, नगरपालिका सफाई कामगार, पत्रकार आदी कोरोना योद्धांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला 7000 डोलो गोळ्याची भेट डॉ विनोद माहुरे, डॉ प्रतिभा होनशेट्टे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी सफाई महिला कामगारांना साडी चोळी भेट देऊन गौरव करण्यात आला, या छोट्याखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार कल्याण गायकवाड तर प्रमुख पाहूने म्हणून पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महिंद्र गायकवाड, शेषीकांत गाढे, अनिकेत कदम, सुभाष दरबस्तेवार, मोहम्मद अफजल, रूपेश साठे, कामगार संघटना अध्यक्ष सयाराम मुकेरवार आदी उपस्थित होते.
यावेळी कल्याण गायकवाड, सुभाष दरबस्तेवार, मोहम्मद अफजल, सौ.सावंत मॅडम आदींनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख ईसमाईल, मोहम्मद मुनीर, शेख वाजीद आदीनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अमरनाथ कांबळे यांनी मानले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या