लष्करातून नुकतीच ट्रेनिंग संपून गावी परतलेल्या सैनिक च जंगी स्वागत !

[ कुंटूर प्रतिनिधी बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील बळेगाव येथे मात्र बळेगाव गावातुन मराठा समाजातील पहिला वेक्ती इंडियन आर्मी मध्ये भरती होऊन पुर्ण ट्रेनिंग संपून आल्याने गावात आलेल्या जवानाचे जंगी स्वागत करण्यात आले. वाजत गाजत गावातून मिरवणूकही काढण्यात आली.

नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर परीसरातील बळेगाव गावचे जवान  हनमंत रावसाहेब बेलकर   यांना हा अनोखा अनुभव आला. लष्करातील पूर्ण ट्रेनिंग करून ते गावात परतले आहेत. गावाच्या या सुपुत्राचे बळेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ  यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
बेलकर यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी आरती करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने हनमंत बेलकर हेही भारावून गेले.

4 आक्टोबर  रोजी हा स्वागत समारोह झाला असून ढोल ताशे व बॅन्ड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .
हानमंत रावसाहेब बेलकर हे भारतीय सैन्य दलात कार्यरत झाले ते बेळगाव कर्नाटक येथुन एका वर्षात लष्करात ट्रेनिंग संपुन नुकतीच पोस्टीग गुजरात गांधीनगर येथे झाली आहे.
नुकतीच ट्रेनिंग संपुन आलेल्या सैनिक यांचा सत्कार उप सरपंच गंगाधरराव पा बेलकर, चेअरमन मा साईनाथ बेलकर, पत्रकार बालाजी हनमंते, शेषेराव बेलकर, जिल्हा परिषद मुख्याध्यापक पांडुरंग पाटील, बालाजी पवार मा परमेश्वर बेलकर, तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील बेलकर, प्रकाश पाटील बेलकर, रंजीत गायकवाड, देविदास गायकवाड, रोहिदास गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, पत्रकार, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. मायभूमीची सेवा करण्यासाठी पाठविलेल्या त्याचे वडील रावसाहेब पाटील बेलकर याचे कौतुक परीसातुन होत आहे.
तरी देशसेवा ही शेवटच्या श्‍वासापर्यंत सुरूच राहील,’ अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करा जवान हानमंत रावसाहेब बेलकर यांनी व्यक्त केली.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या