हरिश्चंद्र कार्लेकर यांना जिल्हास्तरीय आदर्श लेखनिक पुरस्काराने सन्मानित !

[ रायगड म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
रायगड जिल्हा परिषद अलिबाग माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे कर्जत शेळके हॉल येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ, ता.म्हसळा या शाळेचे लेखनिक श्री हरिश्चंद्र कार्लेकर यांना पालकमंत्री मा.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा अध्यक्षा योगिता पारधी, आ.बाळाराम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुधाकर घारे, माजी विधानसभा सदस्य धैर्यशील पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, पंचायत समिती म्हसळा सभापती छाया म्हात्रे, संदिप चाचले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या