• प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कायम व कंत्राटी 13 पदे रिक्त
• ग्रामीण रुग्णालय चालू करण्याची मागणी.
पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने अतिसार,उलट्या,ताप आदी रुग्ण वाढण्याची श्यक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरचे अन्न न खाणे,पाणी उकळून पिणे,घरगुती व वैयक्तिक स्वच्छता राखावी
[ डॉ विनोद माहुरे – वैद्यकीय अधिकारी कुंडलवाडी ]
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसापासून एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त असल्यामुळे सद्या कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह प्रभारी डॉक्टर यांच्यावर कुंडलवाडी शहर व परिसरातील रुग्णांचा मोठा भार पडत असल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णांवर होत आहे, अशा गंभीर बाबीकडे जिल्हा आरोग्य विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून रिक्त पदे तात्काळ भरून रुग्णाची होत असलेली हेळसांड दूर करण्याची आवश्यकता आहे….
• कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत पाच उपकेंद्रासह परिसरातील 24 गावांचा समावेश होतो, या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज मोठ्या प्रमाणात शहर व परिसरातील रुग्ण येत असतात. येन पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे रुग्णांना अतिसार,उलट्या,मलेरिया,डेंगू,या साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे हा प्रादुर्भाव लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अद्याप तरी कुठलेही जनजागृती किंवा उपाय योजना केलेली दिसून येत नाही,असे असले तरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक पदे रिक्त आहेत त्यामध्ये कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायम वैद्यकीय अधिकारी एक, औषध निर्माता एक, स्टाफ नर्स एक, कंत्राटी आरोग्य सहाय्यक एक, सेवक दोन,अशी रिक्त पदे असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर रुग्णांचा भार पडत आहे तर उपकेंद्र पिंपळगाव येथे कायम नर्स एक, एम पी डब्ल्यू एक,हुनगुंदा येथे एम पी डब्ल्यू एक,अर्जापूर येथे कायम व कंत्राटी नर्स दोन, आरळी येथे कायम व कंत्राटी नर्स दोन,माचनूर येथे सर्व पदे भरलेली अशी एकूण 13 पदे रिक्त आहेत त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे….
• या प्राथमिक आरोग्य केंद्रावर 24 गावसह पंधरा हजारच्या वर लोकसंख्या असलेल्या कुंडलवाडी शहराचा मोठा भार पडत आहे,शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी पुरवठा व सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना औषधी अभावी गैरसोय होऊन आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे.औषध निर्माता पद रिक्त असल्यामुळे रुग्णांना नर्स किंवा सेविका यांच्या हस्ते सर्रास गोळ्या देण्याचा प्रकार चालू असल्यामुळे रुग्णाच्या जीवितेला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.एखाद्या वेळेस अतिगंभीर अपघातग्रस्त झालेल्या रुग्ण रुग्णालयात आला तर त्यांच्यावर पुढील उपचारासाठी नांदेड किंवा इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ऑक्सीजनयुक्त रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेक रुग्णांचा रस्त्यातच मृत्यू होत आहे तसेच सर्व सोयीयुक्त लॅब नसल्यामुळे अनेक रुग्णांना खाजगी लॅबचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत असल्याचे पहावयास मिळत आहे.
• असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात बांधण्यात आलेल्या शवविच्छेदन गृहाची अवस्था जीर्ण होऊन त्याची दुरावस्था झालेली आहे, जीर्ण झालेल्या शवविच्छेदन गृहाचे स्लॅब कमकुवत झाल्यामुळे सदरील स्लॅब कधीही कोसळू शकतो त्यामुळे प्रेताची अवहेलना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नव्याने शवविच्छेदन गृहाचे बांधकाम करण्याची आवश्यकता आहे..
• गेल्या चार वर्षांपूर्वी कुंडलवाडी शहराला ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले सदरील ग्रामीण रुग्णालय दहा कोटीच्या जवळपास रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले आहे,संबंधित बांधकाम ठेकेदाराने बांधकाम अत्यंत कासवगतीने करून आजतागायत काम पूर्णत्वास आले असले तरी कुंडलवाडी शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत नागरिकांना सर्व सोयीसह ग्रामीण रुग्णालय तात्काळ चालू करून प्राथमिक आरोग्य केंद्रावरील भार कमी करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत…
**** नागरी दवाखाना नावालाच ****
कुंडलवाडी शहराची लोकसंख्या पंधरा हजाराच्या वर आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रुग्णांचा भार कमी करण्याच्या अनुषंगाने शहरातील मिलिंद विद्यालय शाळेच्या जुन्या इमारतीत गेल्या पाच महिन्यांपूर्वी नागरी दवाखाना चालू करण्यात आला,सदरील दवाखाना हा सकाळी 8: 00 ते दुपारी 12 : 30 पर्यंत चालू असून सद्यस्थितीत या रुग्णालयात एक वैद्यकीय अधिकारी,एम पी डब्लू एक,नर्स एक,सेवक दोन आदी कर्मचारी कार्यरत आहेत. या रुग्णालयात पुरेसा औषधी साठा व कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांनी या रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.सदरील रुग्णालयावर शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून ही रुग्णांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नसतील तर सदरील नागरी दवाखाना कशाला सुरू करण्यात आले असा संतप्त सवाल नागरीक उपस्थित करीत आहेत…..
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy