कर्तव्यात कसर नको, जनसेवेला प्राधान्य द्या – आ.अंतापूरकर

“आमदारांच्या भेटीने अधिकार्‍यांनी केली विभागात सुधारणा”.

आमदार जितेश अंतापूरकर हे बिलोली उपजिल्हा रुग्नालयातील काही अधिकारी व त्यांच्या कामातील हलगर्जीपणा संबधित माहिती विभागातील वरीष्ठांना देऊन मला येथे तात्काळ सुधारणा हवी अशी मागणी केली होती. याची दखल घेत नांदेड जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ.भोसीकर हे बिलोली उपजिल्हा रुग्नालयात सोयी सुविधांची माहिती घेतल्याचे कळाल्याने येथील नागरीकांनी समाधान व्यक्त केली आहे.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           बिलोली शहरातील बिलोली उपजिल्हा रुग्णालयात अनेक दिवसापासून नागरीकांच्या विविध तक्रारी आमदारांच्या कानी पडताच आमदार जितेश अंतापूरकरांनी यांनी बिलोली उपजिल्हा रुग्नालयात भेट दिली. यावेळी रुग्नालयातील रुग्णांकडे संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सोबत घेवुन भेट दिली. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतली. यावेळी अधिकारी यांच्याशी संवाद साधत रुग्नालयात येणारे रुग्णांची व्यवस्था होणे अत्यावश्यक आहे त्याकडे दुर्लक्ष नको. येथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कर्तव्यात कसलीच कसर न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा व जनसेवेला विशेष प्राधान्य द्या असा सल्ला देत पुन्हा नागरीकांच्या तक्रार माझ्याकडे येवू नये असा सक्तीचा सल्ला संबधित अधिकारी यांना आमदार अंतापूरकर देण्यास विसरले नाहीत.

      दरम्यान आ.जितेश अंतापूरकरांच्या भेटीनंतर बिलोली उपजिल्हा रुग्नालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांत आमदारांच्या अचानक भेटी दौर्‍यामुळे आमुलाग्र बदल पाहण्यास मिळत असून याबाबत संबधित विभागाचे वरीष्ठांनी आमदार अंतापूरकर यांच्या सुचनाचे पालन करत जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.निळकंट भोसीकर हे बिलोली उपजिल्हा रुग्नालयात भेट देवून सोयी सुविधाचे आढावा घेतल्याचे माहिती रुग्नालयातून मिळाली.
 आ.अंतापूरकरांच्या भेटीने बिलोलीतील विविध विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांनी आपल्या कामात गती आणल्याचे चर्चा नागरीक करीत असून कधीही होईल अचानक आमदार दौरा अन तूम्ही तुमचे कामाची पध्दत सुधारा अशी चर्चा बिलोलीतील नागरीक विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना सल्ला देत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या