कुंडलवाडी शहरातील घरफोडीत चोरीला गेले ३ लाख, अन् फिर्यादीला मिळाले ८० हजार !

◆ उर्वरीत रक्कम मिळण्यासाठी फिर्यादीची एसपी कडे लेखी तक्रार
[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
       कुंडलवाडी शहरातील पोचम्मागल्ली भागात दि.२९ डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीत ३ लाख रुपये चोरीला गेले होते याप्रकरणी कुंडलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोडी प्रकरणात ३ लाख रुपये चोरीला गेले असताना कुंडलवाडी पोलिसांनी फिर्यादीस ८० हजार रुपये दिले उर्वरित रक्कम व सोने दिले नाही उर्वरित रक्कम मिळण्यासाठी फिर्यादी दुर्गा दमकोंडवार यांनी एसपी कडे लेखी तक्रार केली आहे.

             याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिलेल्या निवेदनानुसार शहरातील पोचम्मागल्ली भागातील दुर्गा दमकोंडवार या घरी नसतानि दि.२९ डिसेंबर रोजी घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ५ तोळे सोने व १ लाख रुपये असे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.या प्रकरणात कुंडलवाडी पोलिसांत गु.र.नं.१५७/२०२३ नुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासात चोरटे निष्पन्न झाले असे पोलिसामार्फत दुर्गा यांना समजले व दि.१० जानेवारी रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी चोरी गेलेल्या ३ लाखांपैकी फक्त ८० हजार रुपये दिले.
उर्वरित रक्कम व सोने दुर्गा दमकोंडवार यांना दिले गेले नाही यामुळे ५ तोळे सोन्याचे बांगड्या व उर्वरित रक्कम मला मिळावी यासाठी दुर्गा दमकोंडवार यांनी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या