डोंगरगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर नागरिकांचे विविध मागण्या साठी आमरण उपोषण !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
कुंटुर जिल्हा परिषद सर्कल मधिल मौजे डोंगरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील ग्रामपंचायत सदस्य व काही नागरिकांनी विविध प्रकारच्या मागण्या साठी अमरण उपोषणास बसले आहे.
गावातील विविध मागण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत समोर हे उपोषण केल्यामुळे गावातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

डोंगरगाव तालुका नायगाव येथील नागरिकांनी विविध मागण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने व तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना विविध मागण्यासाठी दिनांक 16 /9 /2021 रोजी अमरण उपोषण साठी ग्रामपंचायत समोर परवानगी घेऊन बसले आहेत.

सदर ग्रामपंचायत अंतर्गत पांदण रस्त्याच्या काम त्वरित मंजुरी देणे, कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांना योजना मिळून देणे, पिक विमा योजना संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांना सरसकट लागु करा, गोठा, शेळीपालन , कुकुटपालन, सिंचन विहीर कंपोस्ट खत निर्मिती विविध योजना ग्रामपंचायत कार्यालय डोंगरगाव येथील घरकुल शौचालय चौकशी करा व बोगस लाभार्थी अधिकाऱ्यांच्या गुन्हे दाखल करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डोंगरगाव ग्रामपंचायत येथील संगणक तात्काळ शोधून ग्रामपंचायतीमध्ये ठेवा, डिजिटल इंडियामार्फत डोंगरगाव ग्रामपंचायत डिजिटल करा, दिव्यांग व्यक्तीचे तीन टक्के अनुदान वाटप करा, महाकली देवी डोंगरगाव च्या नावाने ग्रामपंचायत मालमत्तेवर कर्ज उचलून खाणाऱ्या व्यक्तीला वर गुन्हे दाखल करा, ग्रामपंचायत डोंगरगाव येथील आडगाव खर्चाची नोंद वही सबमिट करा, 14 व्या वित्त आयोगाच्या निधी ची माहिती द्या, एकूण 16 मागण्या घेऊन ग्रामपंचायत समोर उपोषणासाठी गावातील असंख्य नागरिक उपोषणास बसले आहेत.
याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले असून पंचायत समिती अधिकारी व ग्रामसेवक काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या