घरकुल योजनेसाठी नागरिकांचे नगरपालिकेसमोर उपोषण ; प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
  येथील डॉआंबेडकर नगर, साठे नगर, नई आबादी, वंजार गल्ली, येथील काही नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नसल्यामुळे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येवर दिनांक 14 रोजी 10 वाजता नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसले होते.प्रभारी मुख्याधिकारी आर जी चव्हाण यांच्या आश्वासना नंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

          कुंडलवाडी नगरपालिकेतर्गत तत्कालीन भाजपा सत्ताधाऱ्यांनी शहरातून जवळपास 2200 घरकुलांचे अर्ज अर्ज मागविण्यात आले होते,त्यापैकी घरकुलाच्या पहिल्या डी पी आर मध्ये पंतप्रधान आवास योजनेचे 1304 घरकुल मंजूर झाले तर दुसऱ्या डीपीआर मध्ये 197 घरकुल असे एकूण 1501 घरकुल मंजूर झाले आहेत.1501 घरकुला पैकी सद्यस्थितीत शहरात 400 घरांचे बांधकाम पूर्ण झाले तर 200 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर असून ज्या लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम परवानगी व बांधकाम न केलेल्या 900 लाभार्थ्यांची नावे शासनाने घरकुल योजनेतून रद्द केले आहे.असे असले तरी शहरातील आंबेडकर नगर, साठे नगर, नई आबादी, वंजार गल्ली,येथील काही खरे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले असून अशा लाभार्थ्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे गेल्या पाच वर्षांपासून वारंवार कागदपत्रे देऊन घरकुलांची मागणी करत आहेत तरी पण या घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ अद्याप मिळाला नाही पण दुसरी कडे ज्या लाभार्थ्यांना घरकुलांची गरज नव्हती आशा लाभार्थ्यांची नावे घरकुलाच्या मंजूर यादीत आल्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.
असे असले तरी या खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून दिनांक 14 रोजी 10 वाजता ज्योती प्रकाश वाघमारे,गंगाधर नागोराव वाघमारे, नागरबाई लक्ष्मण वाघमारे, साहेबराव गंगाधर वाघमारे, सुंदरबाई सयाजी गायकवाड, गोपाबाई मोहन हातोडे, सायबनबाई आनंदा वाघमारे, साहेबराव सोपान वाघमारे, रझा बेग नबीसाब शेख, वहिदाबी अहमद मिया शेख, कलावती शंकर करपे, गंगाबाई सखाराम करपे, चारुशीला साहेबराव येलमे, आदींनी नगरपालिके समोर आमरण उपोषणास बसले आहेत.प्रभारी मुख्याधिकारी आर जी चव्हाण यांच्या आश्वासना नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या