तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तहसील समोर उपोषण

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
            नायगांव तालुक्यातील , नायगांव तालुक्यातील चालु आसलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे या साठी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने नायगांव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
         नायगांव तालुक्यात मोठ्यात प्रमाणात महामार्गावरील हाॅटेल व गावागावात अवैध देशी दारू, नरसी , नायगांव शहरात मटका आणि गुटखा मोठ्यात विक्री होत आसतना संबंधीत पोलीस ठाणयाचे ठाणे प्रमुख दुर्लक्ष करित आसल्याचे असे लोकस्वराज्य आंदोलनाचे कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पवार, आणि गणपत रेड्डी यानी निवेदनात म्हटले आहे.
कुठलीच विक्रीचा परवानगी नसताना महामार्गा लगतच्या आनेक हाॅटेल वर अवैध देशी विदेशी दारू राजरोसपणे विक्री होत आसताना पोलीस मात्र बग्याची भुमिका घेत आसल्याने आनेक तरूण वेसणाच्या आहारी जाऊन संसार उद्ध्वस्त होत आहे.
          नायगांव तालुक्यात आनेक ठीखाणी मटका , गुटखा, पत्ते असे आनेक अवैध धंदे वाढले आसुन या गंभीर बाबीकडे संबधीत पोलीस जाणीवपुर्वक लक्ष देत नसल्याने हे अवैध धंदे बंद करण्यात यावे या साठी २४ जानेवारी पासून लोकस्वराज्य आंदोलन चे रावसाहेब पवार व गणपत रेडी हे दोन कार्यकर्ते नायगांव येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आसुन उपोषनाचा दुसरा दिवस आहे. नायगांव, कुंटूर, रामतीर्थ पोलीस ठाण्या अंतर्गत चालु आसलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आसा इशारा ही लोकस्वराज्य चे रावसाहेब यानी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या