हुनगुंदा येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथून जवळच असलेल्या हुनगुंदा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त ७ एप्रिल रोजी समाज बांधव व गावातील प्रमुख व्यक्तीच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीत सर्वानुमते भीम जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
त्यात अध्यक्ष महेंद्र हानमंत मराठे, उपाध्यक्ष संदीप देविदास भालेराव, सुभाष बाळू कांबळे, सहसचिव रामदास तुळशीराम बुध्देवार, सहसचिव लालु बाळू कांबळे, कोषाध्यक्ष सुरेश गणपत भालेराव ,संघटक उमेश भालेराव, सहसंघटक भालेराव विश्वनाथ पोचिराम, सदस्य लक्ष्‍मण पोचीराम भालेराव, सल्लागार समिती अध्यक्ष शाहीर नागनाथ संभाजी बोधलेवार,अशोक बोधलेवार,महेद्र बोधलेवार,आदींची निवड करण्यात आली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या