श्री.संतोष जंगम यांचा रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मान !

[ रायगड / म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
सन 2021 या वर्षाचा घोषित झा लेला माध्यमिक विभागाचा शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज म्हसळयाचे शिक्षकेत्तर सेवक श्री संतोष धों. जंगम यांना कर्जत येथे रायगड जिल्हापरिषदेच्या वतीने “आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री.संतोष धों.जंगम गेली 25 वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवा बजावित आहेत त्यांनी आपल्या नौकरीची सुरुवात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुरच्या गुळसुंदे ता.पनवेल येथून केली ते 2000 पासून आज पर्यन्त न्यू इंग्लिश स्कुल व ज्यू. कॉलेज
म्हसळा येथे सेवा बजावत आहेत.
आज पर्यन्त सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांच्या कार्यकाळात प्रामाणिक सेवा करुण शालेय प्रशासनाला चांगले सहकार्य दिले. शासकीय कार्यालयाना जंगम यांचे सहकार्य लाभले. सर्व अधिकारी, कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने प्रत्येक जनाशी ते जोडले गेले आहेत.
शाळेच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान लाभले त्यांना आधार फॉउंडेशन, भारतीय जैन संघ व पी.एन पाष्टि यांच्या वतीने ही उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.
2020 मधे “कोकण रत्न पुरस्कारने व आता 2021 चा आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने कर्जत येथे सन्मानित करण्यात आले. या बद्दल त्यांचे म्हसळा पंचयात समितीचे सभापती सौ.छायाताई म्हात्रे, उपसभापती श्री संदीप चाचले, जि.प.सदस्य बबन मनवे, गट विकास अधिकारी प्रभे साहेब, शिक्षणधिकारी राजेश कदम साहेब, स्कुल कमिटी चेअरमन समीरजी बनकर सर्व स्कुल कमिटी म्हसळा ग्रामस्थ, शिक्षक, पालक, सहकारी बांधव मित्र परिवार यानी प्रत्यक्ष व फोन द्वारे त्यांचे अभिनदंन केले.
न्यू इंग्लिश स्कुल व ज्यू.कॉलेज म्हसळा चे मुख्याध्यापक श्री.पी.जी मोरे सर यांनी विशेष कौतुक केले. या वेळी श्री जंगम यांनी हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून मा.चेअरमन व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाने व सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बांधवाच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार लाभल्याचे सांगितले.हा सन्मान माझा एकटयाचा नसून सर्व सहकाऱ्याचा आहे असे म्हटले.

ताज्या बातम्या