पी.एन.पी.पाष्ठी शाळेचे शिक्षक श्री विनय कुमार सोनवणे आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित !

[ म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
रायगड जिल्हा परिषद चे सन‌ २०२०-२१ व सन २०२१-२२ चे जिल्हा आदर्श शिक्षक ( प्राथमिक व माध्यमिक ) पुरस्कार तसेच आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा दि. १ आक्टो रोजी शेळके हाॅल कर्जत येथे कोवीड चे सर्व नियम पाळून संपन्न झाला. या मध्ये पी.एन.पी पाष्ठी शाळेचे शिक्षक श्री विनय कुमार सोनवणे यांना “आदर्श शिक्षक “पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
श्री सोनवणे सर हे एक उत्तम वक्ते व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून रायगड जिल्ह्यात परिचित आहेत तसेच ते अ.नि.स चे रायगड विभागात सक्रीय काम करत आहेत.
आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने श्री सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित पर तालुक्यात प्रशिक्षण संस्था सुरु करुन खुप मोठे कार्य केले आहे. याच्या माध्यमातून अनेक मुले मूली प्रशिक्षण घेऊन कुटूंबाला मदत करू लागले आहेत.

ताज्या बातम्या