राहेर परिसरात अवैध वीट भट्ट्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात -प्रशासनाचे जाणीव जाणीवपूर्वक दुर्लक्ष 

[ राहेर -बाबुराव पाटील भुते ]
राहेर व परिसरातील वीट भट्ट्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाचे मात्र साप दुर्लक्ष होत आहे. अवैध वृक्षतोड व अवैध गौन खनिज उत्खनन वाढले आहे. राहेर व परिसरामध्ये अवैध शेकडो वीटभट्टीमुळे प्रदूषणात वाढ झाली असून वीट भट्टीला लागणारे जळाऊ लाकूड व माती उत्खनन होत आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. अवैध वृक्षतोड व अवैध माती उत्खनन बंद करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होताना दिसत आहे.

राहेर व परिसरात गोदावरी नदी काठच्या गावामध्ये शेकडो वीट भट्ट्या चालू आहेत.त्या वीटभट्टी यांना जळाऊ लाकूड व माती उत्खनन अवैधरित्या चालू आहे.नाममात्र एका सर्वे नंबर मध्ये दोनशे ब्रास ची रॉयल्टी काढून हजारो ब्रास माती उत्खनन करणे चालू आहे. वृक्षतोड करून टेम्पो व ट्रॅक्टरने जळाऊ लाकूड वीट भट्टी यांना टाकीत आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

शासनाने झाडे लावा झाडे जगवा हे कार्यक्रम हाती घेतला असून यावर करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र संबंधित वनविभाग व तहसील प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष मुळे केलेला करोडो रुपयाचा खर्च वाया जात आहे. ज्याप्रमाणे आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा असे चालले आहे. गोदावरी नदीपात्र उत्खनन होत असल्याने नदी मात्र रुंद होत आहे.

यामुळे गोदावरी नदीवरील पुलास मोठा धोका निर्माण झाला आहे. याची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार नायगाव व वन विभाग बिलोली यांनी तात्काळ कारवाई करून अवैध धंदे रोखावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होताना दिसून येत आहे.
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या