राहेर व परिसरातील गावांमध्ये अवैध देशी दारू व पेट्रोल विक्री चालू असून संबंधित पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी या अवैध धंद्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पोलिसांनी लक्ष घालून अवैद्य धंदे बंद करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
राहेर हे सर्व देवाचे माहेर म्हणून संपूर्ण भारतात ओळख आहे. व श्री चक्रधर स्वामी यांचे पदस्पर्शाने राहेर नगरी पुनीत झाली असून भारतातून अनेक राज्यातून भाविक राहेर येथे येतात मात्र आज घडीला राहेर गाव आहे अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे.
कुंटूर पोलीस ठाणे हद्दीतील राहेर नवीन बस स्टैंड व जुने बस स्टॅन्ड रोडवरील अनेक धाब्यावर पान टपरी, दुकानात अवैध धंदे चालू आहेत. त्यात युवराज धाबा, नदीकाठावरील जुने बस स्टँड रोडवरील धाबा व हॉटेल्स ह्यामध्ये अवैद्य धंदे चालू आहेत. एम.ए.सी.बी.ऑफिस समोर पान टपरीत देशी दारू विक्री चालू आहे. राहेर ते तोरणा रोड वरील धाबा येथे देशी दारू विक्री चालू आहे.
कुंभारगाव बस स्टँड रोडवर हॉटेल्समध्ये देशी दारू विक्री व पेट्रोल विक्री चालू आहे. गागलेगाव बस स्टॅन्ड रोडवर हॉटेलमध्ये देशी दारू व पेट्रोल विक्री चालू आहे. गाव हरणाळा येथे एक परवानाधारक देशी दारू दुकान असून त्या दुकानातून अवैद्य पार्सल विक्री न होता अवैध दारु विक्री करणारे नरसी येथील एसटी बस स्टँड रोड समोरील देशी दारू दुकानातून पार्सल आणत असल्याची माहिती आमच्या चॅनल च्या प्रतिनिधी जवळ हरनाळा येथील परवानाधारक देशी दुकानदार मालक विजय पाटील यांनी बोलताना माहिती दिली.
मात्र या अवैध धंदे वाल्यांना संबधित पोलीस स्टेशन कुंटूर व पोलीस ठाणे शंकर नगर ह्यांनी जणू परवानगीच दिली असावी असे अवैध धंदेवाल्यांचे मनोधर्य वाढले आहे. हे अवैध धंदे बंद करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy